Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : फेसबुक अकाऊंट वरून परशाने केली फसवणूक !

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- बहुचर्चित सैराट चित्रपटातील आर्चीचा हिरो ‘ परशा ‘ म्हणजे सिने अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी फसवणूक झालेला तरुण हर्षल अमोल कांडेकर , वय 27  रा . व्हिडीओकॉन कंपनी पाठीमागे ब्लॉक नं.107, अमोल एंटरप्रायजेस एमआयडीसी , नगर या तरुणाने सायबर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलीय.

आरोपी आकाश ठोसर या नावाचे बनावट फेसबुक अकॉऊंट धारक व मोबाईल नं ८२८५८७९६९६ हा मोबाईल धारक याच्याविरुद्ध भादवि कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .

हर्पल कांडेकर या तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे की ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2020 फेसबुक अकॉऊंटवरुन एमआयडीसी परिसर संबंधित फेसबुक अकांऊटधारक याने विश्वास संपादन करून

माझ्याकडून सोन्याचे एक मंगळसूत्र व हातातील सोन्याची अंगठी असे सोन्याचे दोन दागिने अंदाजे वजन 5 तोळे , किंमत दीड लाख रुपये म सदर दागिने परत करतो , असे सांगून दागिने परत न करता 1 लाख  50 हजाराची फसवणूक केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Get real time updates directly on you device, subscribe now.