आपलीच पाठ थोपटून घेऊन नगरची फसवणूक करू नका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये अगोदरपासूनच मागे असलेल्या अहमदनगर शहराची यावर्षी दांडी उडाली आहे. मागील वर्षी दोन स्टार मिळवणाऱ्या अहमदनगर महानगरपालिकेला यावर्षी एका स्टारवर समाधान मानावे लागलेले आहे . पण अहमदनगर महानगर पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी नगर शहर कचरा मुक्त झाल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र घेऊन आपलीच पाठ थोपटून घेत आहेत .

ही नगर शहराची फसवणूक आहे . असे करू नका असा सल्ला शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे. याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्दीला दिले आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्ये राज्यात सर्वप्रथम येऊ पाहणाऱ्या अहमदनगर महानगर पालिकेला यावर्षी अवघा एक स्टार मिळाला.

नगर पासून जवळच असलेल्या आणि लाखो भक्तांच्या वावराने गजबजलेल्या साईभूमी शिर्डीने मात्र थ्री स्टारचा दर्जा मिळवत देशात नावलौकिक राखला . तर दुसरीकडे देवळाली प्रवरा पालिकेने थ्री स्टार चा दर्जा कायम राखत सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्स्कार देखील मिळवला .

या स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी पालिका महापालिकाना एक ते पाच दरम्यान गुणवत्तेनुसार कोणता ना कोणता दर्जा मिळतच असतो . त्या अंगाने जर आपण या निकालाकडे पहिले तर एखाद्या स्पर्धेत स्पर्धक पासापुरते मार्क मिळऊन सहभागाचे प्रमाणपत्र मिळवतो आणि आपण स्वतः उत्कृष्ठ असल्याचे भासवतो असा हा प्रकार असल्याची सध्या शहरात चर्चा आहे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या स्वच्छता व कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगची घोषणा केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने मंत्री हरदीप सिंग यांनी मंगळवारी केली. भाजपाची सत्ता असलेल्या अहमदनगर महानगरपालिकेने ‘स्वच्छ अहमदनगर , सुंदर अहमदनगर , हरित अहमदनगर ’ची घोषणा केली आणि राज्यातील सर्वाधिक सुंदर शहर करण्याचे स्वप्न बघणाऱ्या अहमदनगरला केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या सर्वेक्षणाने यावेळी जोरदार धक्का दिला .

केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाचे हे पाचवे वर्ष होते. अभियानाअंतर्गत दरवर्षी स्वच्छ शहर स्पर्धेचे जानेवारीमध्ये आयोजन केले जाते. या अभियानात शहर हागणदारीमुक्त करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे या दोन मुख्य बाबींचा समावेश असतो. अभियानात सर्वाधिक चांगले काम करणाऱ्या कचरामुक्त शहरांना तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) दिले जाते.

सिंगल स्टार मिळवून देशातील पहिल्या १०० स्वच्छ शहरामध्ये येण्याचा मान कागदोपत्री जरी नगर महानगर पालिकेला मिळाला तरी आम्हाला आनंदच आहे. पण प्रत्यक्षात धूळ आणि कचऱ्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नगर शहरातील दुर्गंधी आणि घाण हटवण्यासाठी आंदोलने झाली .

नगरकरांना आणि शिवसेनेला वेळोवेळी रस्त्यावर उतरावे लागले पण नगर शहर परिसरातील कचरा १०० टक्के हटलेला नाही . हि वस्तुस्तिथी आहे. तरीदेखील नव्हत्याचे होते करण्याचे कागदोपत्री कसब आपल्या पालिका अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या हातात आहे हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या सर्वेक्षणात पालिकेला पहिल्या ६००० गुणांपैकी ७०० गुण मिळाले . म्हणजे या परीक्षेत आपली पालिका जेमतेम ११ टक्के गुण मिळवून चक्क नापास झाली आहे.

पण देशातल्या २५०० शहरांपैकी पहिल्या १४७ शहरांच्या यादीत स्थान मिळवणे इतकेच काय ते समाधान नगरच्या पालिकेला आहे. आपले शहर खरंच स्वच्छ सुंदर हरित झाले आहे का ? याचे आत्मपरीक्षण मनपा अधिकारी पदाधिकाऱ्यांनी करावे आणि विकास कामाच्या नावाखाली नगरकरांची आपण करीत असलेली घोर फसवणूक थांबवावी असा विनंतीवजा सल्ला गिरीश जाधव यांनी दिला आहे .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment