Lifestyle

तुम्हाला चालण्याची सवय आहे ? आता उलटे चाला, हे होतील फायदे

चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. बरीच लोकांना सकाळी किंवा सायंकाळी चालण्याची सवय असते. परंतु यात थोडा बदल करून उलटे चाललात तर?  स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार उलटे चालणे आणि धावणे हा चांगला कार्डिओ आहे.

याचा वजन कमी करण्यासाठी आणि शारीरिक रचनेसाठी देखील फायदा होईल असे म्हटले आहे. जाणून घेऊयात आणखी काही फायदे –

१) पायांची ताकद वाढते

 सर्वसाधारणपणे आपण सरळ चालतो, त्यावेळी पायांच्या पुढील स्नायूंवर परिणाम होता. जेव्हा आपण उलटे चालता, त्यावेळी मागील स्नायूंची हालचाल होते व पाय अधिक मजबूत होतात.

२) गुडघ्यांचे आरोग्य सुधारते  –

 एमसी मस्क्यूलोस्केलेटल डिसऑर्डर जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, ज्या लोकांच्या गुडघ्यात वेदना होतात, अथवा दुखापत झालेली असते अशी लोक उलटे चालू शकतात. ज्यामुळे गुडघ्यांवर अधिक ताण पडणार नाही.

३) समन्वयात सुधारणा

 उलटे चालत असताना आपण नेहमीपेक्षा वेगळी क्रिया करत असतो, त्यामुळे अशा स्थितीत शरीराचा समन्वय साधणे गरजेचे असते. तुमच्या मेंदूने योग्यरित्या तुम्हाला सुचना देणे आवश्यक आहेत. यासोबतच ध्यान केंद्रीत करण्यास मदत करते. म्हणजेच आपल्या समन्वयात सुधारणा होते.

४) हार्मोन्सची निर्मिती–

 जर्नल फिजिकल थेरेपीनुसार, उलटे चालल्याने समतोल वाढतो व हार्मोन्सची निर्मिती करते, जे तुमच्या संवेदना शांत करतात.

५) पाठदुखीची समस्या कमी होते –

 हॅमस्ट्रिंग्सची समस्या तुमच्या पाठदुखीचे कारण ठरू शकते. हे टाळण्यासाठी दररोज 15 मिनिटे चालणे फायदेशीर ठरते. यासोबतच आणखी एक फायदा म्हणजे वजन कमी होण्यास देखील यामुळे फायदा होतो.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button