दारू पिताना ‘या’ गोष्टींचे करू नका सेवन अन्यथा होईल ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 मुंबई : आज अनेकांना मद्यपान करण्याचे व्यसन लागले आहे. परंतु हे व्यसन शरीरासाठी अत्यंत घातक आहे. मद्यपान टाळण्याचा सल्ला नेहमी डॉक्टर्स देताना दिसतात,

परंतु अनेकांना दारूसोबत काही गोष्टी खाण्याच्या सवयी असतात.  या ठिकाणी आपण पाहूया के दारूसोबत काय खाऊ नये याविषयी.

१) काजू-शेंगदाणे,चिप्स
अनेकांना दारूसोबत काजू आणि शेंगदाने खाण्याची सवय असते. हे टाळले पाहिजे कारण यामध्ये कॉलेस्ट्रॉल असते. त्यामुळे शेंगदाणे आणि काजू तुमची भूक मारते.  दारू प्यायल्यानंतर तुम्हांला हॅगओव्हर झाल्यासारखे वाटते.

तसेच दारूसोबत सोडा किंवा कोल्ड ड्रिंक प्यायल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. दारूसोबत तळलेले पदार्थ खाल्ल्यास अॅसिडीटीसारखी समस्या देखील उद्भवते.

तर दारूसोबत काही लोक चिप्स खातात. चिप्स खाल्ल्याने खूप तहान लागते त्यामुळे अशी लोक जास्त दारू पितात.

२) गोड पदार्थ
दारू पित असताना कधीही गोड खाऊ नये. हे पदार्थ दारूची नशा डबल करतात. याव्यतिरिक्त गोड पदार्थ दारूच्या नशेला आणखी विषारी करतात.

३) मासांहारी आणि मसालेदार जेवण
दारूमुळे पोटात अॅसिडीटी होते. त्यामुळे पोटातल्या जळजळीपासून वाचण्यासाठी दारू पिताना किंवा त्यानंतर मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नये. बिर्यानी, कुर्मा भाजी असे पदार्थ खाणे टाळावे.

४) काही लोक दारू पिताना दुधापासून बनवलेले पदार्थ खातात. जसं की, दही, चीज, लोणी, असे पदार्थ खाण्याची सवय असते. हे सर्व पदार्थ पचण्यासाठी खूप वेळ घेतात. यासोबतच पिझ्झा आणि पास्ता खाणे देखील टाळा.

Leave a Comment