Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची कोरोनाच्या भितीने आत्महत्या

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- माजी खासदार डॉ दत्ता सामंत यांचे वडील बंधू, कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष दादा सामंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते.

शुक्रवार (22 मे) रोजी बोरीवलीत त्यांची मोठी मुलगी गीता प्रभू यांच्या घरी त्यांनी आत्महत्या केली.शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी बोरिवली (पूर्व), दौलतनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या मागे पत्नी प्रमोदीनी तीन विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे होते.

दादा सामंत यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.