Lifestyle

जाणून घ्या तुळशीच्या पानांचे फायदे

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय लोक तुळशीला सूख-शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का की तुळस अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. जाणून घेऊयात हे फायदे-

  तुळशीचे फायदे खालीलप्रमाणे –

  – तुळशीच्या पानांमध्ये अॅंटिऑक्सिडन्टस गुणांचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे तुमच्या शरिराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास निश्चितपणे मदत मिळते.

 – श्वसन त्रासावर उपकारक – श्वास घेण्यास तुम्हाला त्रास होत असेल, अथवा श्वासाच्या संबंधित तुम्हाला आजार असतील तर दूधासोबत तुळशीची पाने उकळून ते प्यावे. यामुळे दमा, तसेच श्वसनासंबंधित आजारांवर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

–  हृदयाच्या संबंधित आजारांसाठी लाभदायी – दूधामध्ये तुळशीची पाने टाकून ते मिश्रण उकळून घ्या. सकाळी उठल्यावर काही न खाता हे मिश्रण प्या. त्यामुळे हृदयाच्या सबंधित आजार दूर ठेवता येतील.

 –  तणाव कमी करते  –  तुम्हाला तणावाची समस्या जाणवत असेल तर तुळशीच्या पानांचा काढा करून तो जरूर घ्या, त्यामुळे ताण-तणाव दूर राहण्यास मदत मिळेल.

 – सर्दी, खोकला कफ झाल्यास तुळशीच्या पानांचा काढा करून  सुटका मिळते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button