राज्यात ५ हजार ९७५ अनुज्ञप्ती सुरू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि. 22 : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजूरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5 हजार 975 अनुज्ञप्ती सुरू सुरू आहेत.

आज दिवसभरात 30 हजार 624 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात (3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे

तर काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री बंद आहे. राज्यात दि. 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे.

आज एका दिवसात अंदाजित 30,624 ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीद्वारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात.

तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहेत.

सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.

दि.24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी/कर्मचारी तैनात आहेत.

काल दि.21 मे, 2020 रोजी राज्यात 83 गुन्हे नोंदविण्यात आले असून 38 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 28 लाख 92 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.24 मार्च, 2020 पासून दि.21 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 6,067  गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,702 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 606 वाहने जप्त करण्यात आली असून 16 कोटी 45 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे.

त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ असून  commstateexcise@gmail.com हा ई-मेल आहे.

Leave a Comment