Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

राज्यभरात आतापर्यंत १२ हजार ५८३ रुग्णांना घरी सोडले

मुंबई, दि.२२ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज ८५७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ नमुन्यांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ४४ हजार ५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद  शहरात ३, साताऱ्यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३७  पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ६३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २८  रुग्ण आहेत तर ३१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये (७३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २७,२५१ (९०९)

ठाणे: ३६६ (४)

ठाणे मनपा: २२३४ (३३)

नवी मुंबई मनपा: १७७६ (२९)

कल्याण डोंबिवली मनपा: ७२७ (७)

उल्हासनगर मनपा: १४४ (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३)

मीरा भाईंदर मनपा: ३८८ (४)

पालघर:१०७  (३)

वसई विरार मनपा: ४५१ (१४)

रायगड: २९९ (५)

पनवेल मनपा: २८२ (१२)

ठाणे मंडळ एकूण: ३४,१०७ (१०२७)

नाशिक: ११५

नाशिक मनपा: ९३ (२)

मालेगाव मनपा: ७१० (४४)

अहमदनगर: ४९ (५)

अहमदनगर मनपा: २२

धुळे: १७ (३)

धुळे मनपा: ८० (६)

जळगाव: २८६ (३६)

जळगाव मनपा: १०९ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १५१३ (१०३)

पुणे: २८३ (५)

पुणे मनपा: ४४९९ (२३१)

पिंपरी चिंचवड मनपा: २११ (७)

सोलापूर: १० (१)

सोलापूर मनपा:५२२ (३२)

सातारा: २०४ (४)

पुणे मंडळ एकूण: ५७२९ (२८०)

कोल्हापूर:१७५ (१)

कोल्हापूर मनपा: २०

सांगली: ६२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १३५ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४११ (५)

औरंगाबाद:२२

औरंगाबाद मनपा: ११६५ (४२)

जालना: ४६

हिंगोली: ११२

परभणी: १७ (१)

परभणी मनपा: ५

औरंगाबाद मंडळ एकूण: १३६७ (४३)

लातूर: ५८ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: २६

बीड: २६

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८३ (४)

लातूर मंडळ एकूण: २११ (६)

अकोला: ३१ (२)

अकोला मनपा: ३३६ (१५)

अमरावती: ९ (२)

अमरावती मनपा:  १३६ (१२)

यवतमाळ: ११३

बुलढाणा:३९ (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:६७२ (३४)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ४५७ (७)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ९

गोंदिया: २८

चंद्रपूर:  ८

चंद्रपूर मनपा: ७

गडचिरोली: ९

नागपूर मंडळ एकूण:  ५२४ (८)

इतर राज्ये: ४८ (११)

एकूण:  ४४ हजार ५८२  (१५१७)

(टीप आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २५९ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.

प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.

राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६ हजार १५४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६६.३२ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.