Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

कारलं खाल्ल्याने होतील ‘हे’चमत्कारी फायदे

कारलं हे सर्वसामान्यपणे सर्वत्र आढळून येते. सर्वांच्या आहारात कारल्याचा समावेश असतो. कारले चवीला कडू असले तरी पित्त, त्वचारोग, बद्धकोष्ठता आणि मधुमेह यावर रामबाण आहे.  कारले हे आपल्याला कोणत्या आजारांपासून दूर ठेवते हे जाणून घेवूयात

१) श्वसनआजार होतील दूर –

 कारल्यात अँटि-इन्फ्लेमेटरी घटक असतात ज्यामुळे श्वसनप्रणाली सुधारते. सर्दी, खोकला, ताप अशा समस्या दूर होतात. छातीत भरून आल्यास आणि नाकात सर्दी साचून राहिल्यास कारल्याचं सेवन केल्याने अराम पडतो.

२) त्वचा सौंदर्यासाठी फायदेशीर

 कारल्यात अँटिबायोटिक्स घटक असतात ज्यामुळे बॅक्टेरियांचा नाश होतो. त्यामुळे किरकोळ भाजणं, दुखापत, कापणं किंवा खरचटणं अशा जखमा लवकर बऱ्या होतात.

३) मधुमेहावर नियंत्रण

  कारल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि वाढलेल्या साखरेच्या पातळीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना प्रतिबंध होतो. त्यामुळे शुगरचा त्रास असणाऱ्यांनी कारले सेवन केले पाहिजे.

४) रोगप्रतिकारक शक्ती वाढते

 शरीरातील फ्री रेडिकल दूर करण्याची तसंच टिश्यू आणि अवयवांना हानी पोहोचवणाऱ्या इन्फेक्शपासून संरक्षण देण्याची क्षमता कारल्यात असते.

५) रक्तदाब कमी करते

 स्ट्रोक आणिम हार्ट अटॅकचा धोका असलेल्या लोकांचा रक्तदाब नियंत्रणात राहणं खूप गरजेचं असतं. कारल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

६) डोकेदुखीत आराम

 मेंदूच्या भोवतालच्या स्नायूंवर ताण पडल्यास डोकेदुखीची समस्या निर्माण होते. कारल्यामुळे हा तणाव दूर  होतो आणि डोकेदुखीची समस्यादेखील दूर होते. स्ट्रेसमुळे हा ताण येतो आणि असा ताण दूर करण्यात कारलं फायदेशीर आहे.

७) सोरायसिस कमी होतो

 ज्यांना सोरायसिस आहे त्यांनी कारल्याचं सेवन करावं, त्यांच्यामध्ये सुधारणात झाल्याच दिसून येईल. तसंच कारल्याचा ज्युस इतर फंगल्स इन्फेक्शनची समस्यादेखील दूर करतो.

८) यकृताला संरक्षण

 मद्यपानाचं व्यसन असलेल्यांच्या यकृताला हानी पोहोचते. मद्यपानामुळे शरीरात गेलेल्या विषारी घटकांपासून शरीरातील हानी पोहोचलेल्या टिश्यूंना सुधारण्यासाठी कारलं फायदेशीर आहे. यकृताचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी कारल्याचं नियमित सेवन करावं.

९) वजन नियंत्रण

 लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाच्या समस्या अशा अनेक आजारांचा धोका वाढतो. एका अभ्यासानुसार कारलं फॅट पेशींच्या निर्मितीपासून संरक्षण देतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर कारल्याचं सेवन करावं.

Get real time updates directly on you device, subscribe now.