रेल्वेची घेतला ‘हा’मोठा निर्णय; १० दिवसात सुरु करणार ‘ही’ सेवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन जाहीर केले. त्यामुळे कामानिमित्त किंवा रोजगारासाठी इतर राज्यात राहणारे मजूर, शिक्षणासाठी राहणारे विद्यार्थी आणि पर्यटक अडकले गेले.

त्यांच्या प्रवासाची सोय व्हावी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून १ मेपासून ‘श्रमिक ट्रेन’ सुरु करण्यात आल्या होत्या. आता या स्थलांतरितांचे कष्ट कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून आणखी एक महत्वाचा निणर्य घेण्यात आला आहे.

आता पुढच्या १० दिवसात तब्बल २६०० रेल्वेगाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. श्रमिक ट्रेन्सच्या माध्यमातून लाखो मजूर परप्रांतीय आपल्या गावी पोहोचू शकले होते.

मात्र अजूनही लाखो मजूर इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. सद्य परिस्थितीत सुरु असलेल्या रेल्वेगाड्या काही ठराविक शहरातच जात आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी राहणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत.

२६०० रेल्वेगाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असून तब्बल ३६ लाखांच्या वर मजुरांची घरी जाण्याची सोय होऊ शकणार आहे. देशभरतल्या राज्यांच्या मागणीनुसार या रेल्वेगाड्या सुरु केल्या जाणार आहेत.

मात्र या रेल्वेगाड्या पॉईंट-टू-पॉईंट असणार आहेत म्हणजेच संपूर्ण प्रवासात कुठलीही रेल्वेगाडी कोणत्याही स्टेशनवर थांबणार नाहीये.

रेल्वेनं या श्रमिकांच्या सुरळीत आणि सुरक्षित प्रवासासाठी त्या त्या राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये नोडल अधिकारी नेमले आहेत. हे अधिकारीच या सर्व प्रक्रियेत श्रमिकांची मदत करणार आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment