धक्कादायक: चौथ्या मजल्यावरुन सरपटत येऊनही कोरोनासंशयितास मिळाली नाही रुग्णवाहिका

Published on -

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-कल्याण पूर्वेतील भागात धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना संशयितांची कशापद्धतीने हाल सुरु आहेत हे यातून अधोरेखित होते.

येथील कोरोना संशयित वृद्ध दवाखान्यात जाण्यासाठी चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आला परंतु त्यास येईपर्यंत आलेली रुग्णवाहिका निघून गेली.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महापालिकेकडे 33 रुग्णवाहिका आहे. त्यापैकी काही रुग्णवाहिका महापालिकेच्या आहे.

बहुतांशी रुग्णवाहिका या भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या आहेत. रुग्णवाहिका चालकांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. त्यांच्या चाचण्या करण्यात आलेल्या नाहीत.

त्यांना सोयी सुविधा दिलेल्या नाही. खासगी रुग्णवाहिकांवर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्याचाच फटका या वयोवृद्धांना बसला आहे. कल्याण पूर्वेतील हनुमाननगरातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

ते एका चार मजली इमारतीत राहतात. त्यांना कोरोना झाल्याने त्यांच्या घरातील त्यांचे 71 वर्षीय वडील व आई हे दोघे कोरोना संशयित रुग्ण आहेत.

त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मुलांनी फोन केला. या दोन्ही वृद्धांना घेण्यासाठी रुग्णवाहिका सोसायटीच्या दारात आली.परंतु त्यांना येईपर्यंत रुग्णवाहिका निघून गेली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!