‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाची होणार पुन्हा तपासणी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाउनच्या दरम्यान अकोले तालुक्याने कोरोनाला रोखून धरले. पण मुंबईहून आलेल्या ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणीचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोल्यात प्रशासनाची धावपळ झाली आहे.

मात्र, स्वॅब घेताना योग्य निकष पाळले नसल्यामुळे त्या व्यक्तीचा पुन्हा स्वॅब घेऊन चाचणी करण्यात येणार आहे. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, सदर व्यक्ती, त्याचा मुलगा व इतर नऊ अशा ११ जणांना अहमदनगर येथे तातडीने हलविण्यात आले आहे. त्यांचा सरकारी तपासणी अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १२ मे रोजी घाटकोपर -भटवाडी (मुंबई) येथील एक ५६ वर्षीय शिक्षक आपल्या इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलासह मुंबईहुन दुचाकीवर लिंगदेवला आले.

पत्नीलाही त्यांनी यापूर्वीच लिंगदेवला पाठवून दिले होते. लिंगदेवच्या फापाळे वस्तीवर राहणारे हे शिक्षक आपल्या मुलासह मुळगावी परतले खरे पण त्यांनी स्थानिक कोरोना समितीला ही बाब दोन दिवस होऊनही सांगितली नव्हती.

त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शाळेवर क्वारंटाइन होण्यासाठी सांगितले. पण कर्मचारी व या शिक्षकांमध्ये यावरुन बराच वादही झाला.

यानंतर तो शिक्षक व मुलगा हे दोघे माळावरच्या शाळेत १० दिवस क्वारंटाइन झाले. क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर ते होमक्वारंटाइन झाले. होम क्वारंटाइनचा काल शनिवारी चौथा दिवस होता.

दोन दिवसांपूर्वी या शिक्षकांना घशात दुखू लागल्याने ते स्थानिक डॉक्टरकडे गेले असता त्यांनी त्याला संगमनेरला जाण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर संगमनेर येथील खासगी रूग्णालयाने त्यांचे थुंकीचे व घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment