दिलासादायक : ‘त्या’ मृत महिलेचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर पंचक्रोशीत असलेल्या मनाई वस्ती परिसरात काल एक महिला मृत पावली होती. तिला कोरोना अथवा सारी झाल्याची शक्यता वर्तवली होती.

तिच्या स्त्रावाचे नमुने नगर येथे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी ग्रामीण रुग्णालयात प्राप्त झाला. महिला ही निगेटिव्ह आल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी सांगितले.

नगर येथील प्रथमत सुरू झालेल्या प्रयोगशाळेत हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, मनाई वस्तीचा परिसर सिल केला होता, तो आता उघडण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. घरातच बसून लाॅकडाऊनचे पालन करावे. शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment