Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCorona Virus Marathi News

कोरोनाच्या अफवेमुळे दूध डेअरीचालक उध्वस्त होण्यापासून वाचला

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्वच धास्तावले आहे. कोरोना नांव ऐकताच भल्याभल्यांच्या अंगात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. तर एखाद्याला कोरोना झाल्याची अफवा पसरताच त्याला समाजातून बहिष्कृत केल्यासारखी वागणुक देण्याचे प्रकार सध्या घडत आहे. अशीच परिस्थिती एका दूध डेअरीचालकावर ओढवल्याने त्याच्या मदतीला जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी असलेले डॉ.विनय शहा देवदूतासारखे धावून आले.

तर नागरिकांचे कोरोना संदर्भात समाजप्रबोधन करुन डेअरीचा उध्वस्त होत असलेला व्यवसाय वाचवून त्याला पुन्हा उभे केले. सामाजिक बांधिलकी जोपासत एका डॉक्टरने केलेल्या या कार्याचे शहरात कौतुक होत आहे. शहरातील झेंडीगेट हॉटस्पॉट भागाजवळील बफरझोन मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तीची कोठी रोड येथे दूध डेअरी आहे.

या दूध डेअरीतून मार्केटयार्ड परिसरातील नागरिक दूध घेत असतात. परंतू या व्यक्तीला कोरोना असल्याची अफवा वार्‍यासारखी पसरली. या अफवेला बळी पडून ग्राहकांनी या दूध डेअरीवर अक्षरश: बहिष्कारच टाकला. कोणीही दूध घेण्यास येत नसल्याने डेअरीचालक धास्तावला. त्याला डेअरी बंद करण्याची वेळ आली.

अशा कठिण परिस्थितीत या भागातील जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी असलेले डॉ. शहा या डेअरीचालकाच्या मदतीला धावून आले. डॉ.शहा यांनी डेअरीचालकाची तपासणी करुन त्याला कोरोनाची लक्षणे नसल्याचे लक्षात आले. त्यांनी डेअरीचालकाला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले असता, तपासणी होऊन कोरोनाची लक्षणे नसल्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाकडून त्याला देण्यात आले.

डॉ.शहा यांनी ते प्रमाणपत्र त्या भागातील नागरिकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून, सदर व्यक्तीला कोरोनाची लक्षणे नसून, त्याकडून दूध घेण्यास आवाहन केले. तर कोरोना आजारसंदर्भात योग्य मार्गदर्शन करुन नागरिकांच्या मनातील शंका दूर केल्या. डॉ.शहा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे एका व्यक्तीचा व्यवसाय कोरोनाच्या भितीपायी उध्वस्त होण्यापासून वाचला. सदर व्यक्तीने डॉ. शहा यांचे विशेष आभार मानले. सदर दूध डेअरी नियमीत सेवेत रुजू होऊन सध्या ग्राहक दूध घेण्यासाठी दररोज येत आहे.

कोरोनाच्या संकटकाळात चुकीच्या अफवांमुळे एख्याद्या व्यक्तीचे जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. नागरिकांनी एखाद्याला वाळीत टाकण्यापुर्वी माणुसकीच्या भावनेने विचार करण्याची गरज आहे. कोरोना संदर्भातील अफवांवर विश्‍वास न ठेवता सतर्क राहून या संकटकाळात एकमेकास मदत करण्याची गरज असल्याची भावना डॉ. शहा यांनी व्यक्त केली. जायंट्स वेलफेअर फाऊंडेशनचे सदस्य संजय गुगळे यांनी कोरोनाच्या संकटकाळात अफवांवर विश्‍वास न ठेवता अधिकृत माहिती घेण्याचे आवाहन केले. तर डॉ. शहा यांनी सामाजिक बांधिलकीने केलेल्या कार्याचे कौतुक केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button