प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत द्याने येथे १५ खाटांच्या रुग्णालय बांधकामास प्रशासकीय मान्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मालेगाव, दि. 24 :  केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातंर्गत (MsDP) गठित शक्तिप्रदान समितीने द्याने, महानगरपालिका,

मालेगांव येथे अल्पसंख्याक समाजासाठी 15 खाटांच्या रुग्णालय बांधकामासाठी 4 कोटी 15 लाख इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय  मान्यता मिळाल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कळविले आहे.

या रुग्णालयाच्या उभारणीसाठी मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता, त्याला योग्य वेळी यश मिळाल्याचा विशेष आनंद होत असल्याचे मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले. जिल्ह्याच्या तुलनेत सध्या मालेगाव मध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

प्रशासनाने घेतलेली अहोरात्र मेहनत व नागरिकांनी स्वत:ची काळजी घेऊन केलेल्या सहकार्यामुळेच मोठ्या संख्येने रुग्ण आज बरे होताना दिसत आहेत.

भविष्यात अशा प्रकारच्या सामाजिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर आपला विशेष प्रयत्न राहणार असून द्याने येथे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयामुळे येथील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वासही मंत्री श्री.भुसे यांनी व्यक्त केला आहे.

प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रस्तावानुसार यात नमूद केलेला खर्च भागविण्यासाठी केंद्र व राज्य शासनार्मात 60:40 या प्रमाणे हिस्सा राहणार आहे. एकूण मंजूर झालेल्या 4 कोटी 15 लाखापैकी केंद्र शासनाचा एकूण हिस्सा 2 कोटी 49 लाख तर राज्य शासनाचा हिस्सा 1 कोटी 66 लाख इतका राहणार आहे.

या रुग्णालयाच्या बांधकाच्या अंदाजपत्रकास सक्षम प्राधिकाऱ्यांची तांत्रिक मंजूरी घेऊन संबंधित प्रशासनिक विभागास वित्तीय अधिकार प्रदान करण्यात आल्याचेही मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले आहे

Leave a Comment