Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ खात्याचा लिपिक लाच घेताना पकडला

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला. राहुरी येथे आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

अशिफ जैनुद्दिन शेख (वय 41 वर्षे, वर्ग 3 लिपिक, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, राहुरी, रा:- सोनार गल्ली, राहुरी, ता राहुरी, जि अहमदनगर) हे अटक केलेल्याचे नाव आहे.

तक्रारदारास त्यांचे शेतजमिनीचे रस्ता कोर्ट केस करीता त्यांना राहुरी खु || व राहुरी बु || गावाच्या नकाशाच्या प्रती पाहिजे होत्या. सदर प्रति देण्याकरिता लिपिकाने पंचासमक्ष रु 500/- ची मागणी केली.

ही रक्कम आज दुपारी भूमी अभिलेख कार्यालय राहुरी येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष स्वीकारली. त्याना रंगेहाथ पकडले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button