ठाकरे सरकारचे खरे फिल्ड मार्शल हे अजित दादाच !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी अजित दादा कुठं आहेत? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार कायम प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

बैठका, चर्चा आणि उपाययोजनांसाठी पराकाष्टा करत अजित पवार आपल्या कामात स्वत:ला झोकून देत आहेत, अजित पवार हेच खरे सरकारमधील फिल्ड मार्शल आहेत’ असे सांगत आमदार कपिल पाटील यांनी बापट यांना उत्तर दिल आहे.

कपिल पाटील यांनी लॉकडाऊन काळातही अजित पवारांच्या मंत्रालयीन उपस्थितीबाबत माहिती दिली. तसेच, एक-दोन प्रसंग सांगून अजित पवारांची काम करण्याची धडपड समजावून सांगितली आहे.

त्यामध्ये, महाराष्ट्रात असलेल्या उत्तर प्रदेशातील शिक्षकांबद्दलचा एक प्रसंग पाटील यांनी सांगितला आहे. विशेष म्हणजे या प्रसंगात अजित पवार यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही मदत झाल्याचे पाटील यानी सांगितले.

यूपीतल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना घरी जायचं आहे हे त्यांना सांगितल्यानंतर अजित पवारांनी दुसऱ्या क्षणी त्यांनी सचिवांना फोन लावला. ट्रेन जात असेल तर कपिल पाटलांचंही काम करा असं सांगितलं.

पुढे एक श्रमिक ट्रेन शिक्षकांसाठी उपलब्ध झाली. शिक्षक, त्यांचे कुटुंबीय गावी पोचलेही. पण या सगळ्या काळामध्ये दादा कुठेही पडद्यावर येत नाहीत.

पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर जात नाहीत. पण पडद्यामागे राहून एखाद्या फिल्ड मार्शल सारखं तेही युद्ध लढत आहेत. ठाकरे सरकारचे खरे फिल्ड मार्शल हे अजित दादाच आहेत.’ असे आमदार कपिल पाटील यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment