पारनेर मध्ये पुन्हा मुबंईहुन आलेल्या व्यक्तीचा मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील जामगाव येथे मुबंईहुन आलेल्या वृद्ध व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला आहे.

मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा वृद्ध व्यक्ती संपूर्ण कुटुंबासह दि 12 रोजी मुंबई येथून आपल्या गावी आला होता.

काल दि 25 रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने खासगी दवाखान्यात दाखल केले होते तेथून हृदयाचा त्रास होऊ लागल्याने नगर शहरातील एका नामांकित दवाखान्यात त्या व्यक्तीला पाठविले होते मात्र तेथून डॉक्टरांनी पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठविले.

त्या वृद्धाचे श्राव नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment