CrimeMaharashtra

शनी जयंती साजरी करणाऱ्या उपस्थितांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिजयंती उत्सव पार पडला. परंतु तेथील शनिजयंती ही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाली नसून

त्या देवस्थान प्रशासनाने जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन करून त्याची सीसी टीव्ही फुटेज तपासून कारवाईची मागणी देवस्थानचे विश्वस्त यांनी उपविभागीय पोलिस अधीक्षक शेवगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

शनिशिंगणापूर येथील शनिजयंती साडेसातीच्या फेऱ्यात सापडली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रकरणाची दखल घेऊन संबंधित तक्रारदार यांना याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे मुश्रीफ यांनी विश्वस्त शालिनी लांडे यांना आश्वासन दिले.

शनिजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर पोलिस प्रशासनाकडून पत्र देऊन कोरोना पसरू नये म्हणून पाच लोकांच्या आत साजरी करावी, असे लेखी पत्र देवस्थानला देण्यात आले होते.

परंतु देवस्थान मंदिर परिसरात २५ ते ३० नागरिकांनी गर्दी करून कायद्याचा भंग केला. या प्रकरणाची चौकशी करून उपस्थितांवर गुन्हे दाखल करावेत,

अशी मागणी देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त डॉ. रावसाहेब बानकर व शालिनी लांडे यांनी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे व उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे शेवगाव यांच्याकडे तक्रार केली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button