Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती कोरोना रुग्ण ? वाचा तुमच्या भागातील रुग्णांची माहिती

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या 02 आणि पुण्याहून आलेल्या 01 अशा 03 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, उर्वरित 43 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले.

त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून आलेल्या 16 व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत तर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 75 इतकी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.

संगमनेर तालुक्यात २५ रुग्ण आढळले, १६ जणांना घरी सोडण्यात आले, तर तिघांचा मृत्यू झाला. नगर शहरात २१ रुग्ण आढळले असून, १३ जणांना घरी सोडून देण्यात आले, तर एकाचा मृत्यू झाला.

नगर तालुक्यात ५ रुग्ण आढळले असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. तिघांना घरी सोडून देण्यात आले आहे. जामखेडमध्ये १७ रुग्ण आढळले. १६ जणांना घरी सोडण्यात आले, तर एकाचा मृत्यू झाला.

नेवासे तालुक्यात चार रुग्ण आढळले असून, चाैघांना घरी सोडण्यात आले आहे. राहाता तालुक्यात एक रुग्ण आढळला असून त्याला घरी सोडण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यात एक रुग्ण आढळून आला असून, त्याचा मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यात एक रुग्ण आढळून आला असून त्याला घरी सोडण्यात आले.

पारनेर तालुक्यात २ रुग्ण आढळले. एकाचा मृत्यू झाला, तर १ जण उपचार घेत आहे. श्रीरामपूर तालुक्यात २ रुग्ण आढळले असून एकास घरी सोडण्यात आले आहे. अकोले तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button