धक्कादायक : भारतात कोरोनाचा तिसरा आणि महाभयंकर टप्पा सुरु

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-जगभरात थैमान घालणारा कोरोना भारतात जास्त प्रमाणात पसरू नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. परंतु भारतातील विषाणू शास्त्रज्ञ शाहीद जमील यांनी भारतात केव्हाच कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं आहे,

असा दावा केला असून आपले आरोग्य अधिकारी ते मान्य करत नसल्याचं म्हटलं आहे. कम्युनिटी ट्रान्समिशन हा कोरोनाव्हायरसचा तिसरा आणि महाभयंकर असा टप्पा आहे.

आतापर्यंत परदेशातून आलेल्या किंवा त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांना कोरोनाव्हायरसचं निदान होत होतं. मात्र तिसऱ्या टप्प्यात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीने परदेश प्रवास केलेला नसतो किंवा परदेशाहून आलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीशी तिचा संपर्क आलेला नसतो.

एकंदर त्या व्यक्तीला व्हायरसची लागण नेमकी कुठून आणि कशी झाली, याचा धागादोरा सापडत नाही व्हायरसचा स्रोत समजत नाही आणि व्हायरस सर्वत्र पसरू लागतो.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत शाहीद जमील यांनी हा खुलासा केला. जमील हे मोलक्युलर बायोलॉजी, संसर्गजन्य आजार आणि बायोटेक्नॉलॉजीतील तज्ज्ञ आहेत. वेलकम ट्रस्ट/ डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इंडिया अलायन्सचे ते सीईओ आहेत.

ते म्हणतात आयसीएमआरने SARI (severe acute respiratory illness) असलेल्या रुग्णांचा अभ्यास केला. त्यावेळी ज्या 40 टक्के रुग्णांना कोविड-19 असल्याचं निदान झालं.  ते परदेशातून परतलेले नव्हते किंवा तशा कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आले नव्हते.

जर हे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही तर मग काय आहे? असा सवाल विचारत लॉकडाऊनेपेक्षा आयसोलेशन, क्वारंटाइन आणि टेस्टिंगवर भर द्यावा असं जमील म्हणाले.

सध्या 10 लाख लोकसंख्येमागे 1,744 टेस्ट होत आहेत. जगात आपल्या देशाचा टेस्टिंग रेट खूप कमी आहे. आपल्याला अँटिबॉडी टेस्ट आणि आरटी-पीसीआर टेस्ट दोन्ही करायला हव्यात.

यामुळे आपल्याला सध्याची संक्रमित प्रकरणं आणि आधी झालेली संक्रमित प्रकरणं याची माहिती मिळेल. असा सल्लाही जमील यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment