Maharashtra

राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु

मुंबई, दि.२६ : राज्यात आज कोरोनाच्या 2091 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज 1168 रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत 16 हजार 954 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 54 हजार 758 एवढी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 90 हजार 170 नमुन्यांपैकी 54 हजार 758 जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात 5 लाख 67 हजार 622 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 97 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1792 झाली आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी 35 मृत्यू हे मागील दोन दिवसातील आहेत. तर उर्वरित दोन मृत्यू हे 17 एप्रिल ते 23 मे या कालावधीतील आहेत.

या कालावधीतील 62 मृत्यूपैकी मुंबईचे 19, ठाण्याचे 15, कल्याण-डोंबीवलीचे 9, सोलापूरचे 6, मिरा-भाईंदरचे 5, उल्हासनगरचे 3, मालेगाव मधील 3 तर पुण्यातील एक आणि औंरगाबादमधील 1 मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 39, पुण्यात 8, ठाणे शहरात 15, औरंगाबाद शहरात 5, सोलापूरात 7, कल्याण डोंबिवलीमध्ये 10, मीरा-भाईंदरमध्ये 5, मालेगाव आणि उल्हासनगर मध्ये प्रत्येकी 3, नागपूर शहरात 1, रत्नागिरीमध्ये 1 मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 63 पुरुष तर 34 महिला आहेत. आज झालेल्या 97 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 37 रुग्ण आहेत तर 49 रुग्ण हे वय वर्षे ४० ते 59 या वयोगटातील आहेत.

तर 11 जण 40 वर्षांखालील आहे. या 97 रुग्णांपैकी 65 जणांमध्ये (67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका : 32,974 (1065)

ठाणे : 484 (5)

ठाणे मनपा : 2866 (52)

नवी मुंबई मनपा : 2154 (32)

कल्याण डोंबिवली मनपा : 989 (18)

उल्हासनगर मनपा : 198 (6)

भिवंडी निजामपूर मनपा : 99 (3)

मीरा भाईंदर मनपा : 525 (10)

पालघर :122 (3)

वसई विरार मनपा: 630 (15)

रायगड : 471 (5)

पनवेल मनपा : 374 (12)

ठाणे मंडळ एकूण : 41,886 (1226)

नाशिक : 123

नाशिक मनपा : 147 (२)

मालेगाव मनपा: 722 (47)

अहमदनगर : 64 (5)

अहमदनगर मनपा : 20

धुळे : 29 (३)

धुळे मनपा : 100 (6)

जळगाव : 324 (36)

जळगाव मनपा : 123 (5)

नंदूरबार : ३२ (2)

नाशिक मंडळ एकूण : 1684 (106)

पुणे : 383 (7)

पुणे मनपा: 5602 (268)

पिंपरी चिंचवड मनपा: 350 (7)

सोलापूर: 25 (2)

सोलापूर मनपा:621 (47)

सातारा: 339 (5)

पुणे मंडळ एकूण: 7320 (336)

कोल्हापूर:312 (1)

कोल्हापूर मनपा: 28

सांगली: 76

सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)

सिंधुदुर्ग: 19

रत्नागिरी: 171 (5)

कोल्हापूर मंडळ एकूण : 617 (7)

औरंगाबाद : 26 (1)

औरंगाबाद मनपा : 1284 (52)

जालना: 73

हिंगोली: 133

परभणी: 19 (1)

परभणी मनपा: 6

औरंगाबाद मंडळ एकूण : 1541(54)

लातूर: 74 (3)

लातूर मनपा : 8

उस्मानाबाद: 37

बीड: 32

नांदेड: 19

नांदेड मनपा: 86 (5)

लातूर मंडळ एकूण : 256 (8)

अकोला: 39 (2)

अकोला मनपा: 398 (15)

अमरावती: 16 (2)

अमरावती मनपा: 177 (12)

यवतमाळ: 115

बुलढाणा :49 (3)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:802 (34)

नागपूर: 9

नागपूर मनपा: 472 (8)

वर्धा: 7 (1)

भंडारा: 14

गोंदिया: 47

चंद्रपूर: 16

चंद्रपूर मनपा: 9

गडचिरोली: 26

नागपूर मंडळ एकूण : 600 (9)

इतर राज्ये: 52 (12)

एकूण 54 हजार 758 (1792)

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८५ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १०२ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशनअभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.

प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.

राज्यात सध्या २५६२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,७८० सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.९१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button