महाराष्ट्रातून ६९६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय कामगार स्वतःच्या राज्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई दि.२७- महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

दि.२७ मे पर्यंत जवळपास ९ लाख ८२  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ६९६ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ३७४ बिहारमध्ये १६९, मध्य प्रदेशमध्ये ३३, झारखंडमध्ये ३०, कर्नाटक मध्ये ६, ओरिसामध्ये १३, राजस्थान १५, पश्चिम बंगाल ३३, छत्तीसगडमध्ये ६ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ६९६ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधून १११,

लोकमान्य टिळक टर्मिनस ११२, पनवेल ४२, भिवंडी १०, बोरीवली ५२, कल्याण ८, ठाणे २८, बांद्रा टर्मिनल ५८, पुणे ६९, कोल्हापूर २३, सातारा १३, औरंगाबाद १२, नागपूर १४  यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून  विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

Leave a Comment