Maharashtra

इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक

मुंबई दि २७:- सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात आपली फसवणूक होऊ नये यासाठी सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले आहे.

अनेक जण बऱ्याचदा चुकून किंवा अन्य कुतूहलापोटी पोर्नोग्राफिक वेबसाईटवर क्लिक करतात व कालांतराने त्यांना एक मेसेज वा धमकीवजा ई-मेल येतो की, ज्यात असे लिहले असते ‘आम्हाला माहिती आहे

तुम्ही कोणत्या वेबसाईट बघत होता व तुम्ही वापरत असलेले device (कॉम्प्युटर /मोबाईल) हे आमच्या कंट्रोलमध्ये आहे व तुमची सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट देखील आमच्याकडे आहे.

आम्ही ठरविले तर तुमच्या ऑनलाईन कृती व तुम्ही कोणत्या वेबसाईट बघता हे सर्व तुमच्या कॉन्टॅक्टसना कळवू शकतो, जर तसे नको असल्यास तुम्ही या ई-मेल/मेसेज मध्ये नमूद केलेल्या अकाउंटमध्ये बिटकॉईन्सच्या स्वरूपात अमुक अमुक रक्कम २४ तासात जमा करावी ‘.

महाराष्ट्र सायबर विभागामार्फत यासंदर्भात असे आवाहन करण्यात येते की, असे मेसेज हे चुकीचे असून नागरिकांनी त्यांना बळी पडू नये व कोणत्याही प्रकाराची  रक्कम व आपल्या बँक खात्याची माहिती कोणासही देऊ नये.

तसेच सर्व नागरिकांनी हे लक्षात ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे की, आपल्या देशात माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ ब अन्वये child pornography शोधणे देखील  गुन्हा आहे.

तसेच  पोर्नोग्राफिक वेबसाईट पाहताना त्यामधून malware पाठवून तुमच्या कॉम्प्युटर/मोबाईलचा ताबा घेतला जाऊ शकतो त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा वेबसाईट पासून शक्यतो अलिप्त रहावे.

तसेच अशा प्रकारच्या फ्रॉडपासून वाचायचे असेल तर आपल्या ई-मेलचे व बँक खात्यांचे पासवर्ड नियमितपणे बदलत राहा. सगळ्या अकॉउंटसचे पासवर्ड एकच ठेवू नका.

सर्व अकाउंट्सना टू वे ऑथेंटिकेशन (२ way authentication) वापरा जेणेकरून जर कोणी तुमच्या ई-मेल किंवा बँक खात्यामध्ये लॉगिन करायचा प्रयत्न केल्यास तुम्हाला लगेच संदेश येईल.

तसेच अत्याधुनिक व अपडेटेड अँटिव्हायरस (antivirus) आपल्या मोबाईल व कॉम्पुटरमध्ये इन्स्टॉल करा व त्याने आपले मोबाईल व कॉम्पुटर नियमितपणे स्कॅन करा.

आर्थिक व्यवहारात सावधानता

सध्या लॉकडाऊनच्या काळात बरेच लोक स्वतःचे आर्थिक व्यवहारसुद्धा ऑनलाईन व विविध अप्स द्वारे करत आहेत. यातील काही वापरकर्त्यांना एक एसएमएस किंवा फोन किंवा ई-मेल येतो की तुमचे  केवायसी डॉक्युमेंट (kyc documents) ची वैधता संपली असून त्यामुळे तुमचे अकाउंट बंद केले आहे.

तुम्ही खालील नंबरवर फोन करून किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करून आपले KYC documents update करा. अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका व त्या मेसेजमधील लिंकवर क्लिक देखील करू नका.

असे मेसेज किंवा ई-मेल आल्यावर नागरिकांनी सदर मोबाईल अँपच्या (paytm ,bhim google pay इत्यादी) ग्राहकसेवा केंद्राला (customer care) ला फोन करून या मेसेज किंवा ई-मेलची सत्यता पडताळून बघा व मगच त्यावर विश्वास ठेवा.

Paytm कंपनीचे अधिकृत kyc पॉईंट आहेत, आपल्या नजीकच्या kyc पॉईंटला शक्यतो  वैयक्तिकरित्या भेट देऊन आपले kyc update करा. तसेच आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर quickdesk, anydesk, team viewer या सारखे अँप व सॉफ्टवेअर वापरू नका,

कारण या सॉफ्टवेअरद्वारे सायबर भामटे तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा ताबा घेऊ शकतात व तुमची सर्व माहिती हस्तगत करू शकतात.

जर कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद मजकूर असणाऱ्या आशयाचे मेसेजेस आले तर घाबरून जाण्याचे कारण नाही, आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची तक्रार नोंदवा व http://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील याची माहिती द्यावी, असे आवाहन सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले आहे.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close