लग्नाची परवानगी मागताना खोटी माहिती दिल्याने त्या परिवारासोबत झाले असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- मुलीच्या लग्नासाठी महसूल खात्याकडून परवानगी काढताना वर पक्ष कोपरगावातील असल्याचे खोटे सांगितले. मुर्शतपूर येथे मंगळवारी लग्नाच्या ठिकाणी छापा टाकला असता वऱ्हाड मुंबईहून आल्याचे समजताच वधू-वरांसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलीचे वडील उत्तम नबाजी भालेराव यांनी खोटी माहिती देऊन लग्नाची परवानगी मिळवली. लग्नस्थळी अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हते.परवानगी काढताना कोपरगाव भागातील नवरदेवाबरोबर लग्न ठरल्याचे नमूद केले होते.

प्रत्यक्षात लग्न मुंबईतील माटुंगा येथील मुलाशी होणार होते. कारवाईमुळे लग्नाचा बेत फसला. मुंबईची मंडळी इर्टिगा कार (एमएच ०५ डीएस १३०७) व इको (एमएच ०१ डीके ३६९२) यामधून आले होते.

उत्तम नबाजी भालेराव, राजू नारायण सरोदे, अलका राजू सरोदे, अमृत रवींद्र सरोदे, रमेश गोडू धायेकर (सर्व माटुंगा लेबर कॅम्प), रंजना विजय गायकवाड, शीतल विजय गायकवाड, सागर विजय गायकवाड (सर्व कल्याण पश्चिम), आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment