विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, ‘या’कारणामुळे केली भाजप आमदाराने मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ‘पाताल लोक’या वेब सीरिजमध्ये आपल्या संमतीशिवाय आपला फोटो एका गुन्हेगारासोबत वापरल्यामुळे गाझियाबादमधील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी या सीरिजवर टीका केली.

तसेच या वेब सीरिजमध्ये गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण दाखवण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजप आमदाराने या वादावरुन विराट कोहलीने आता अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी खळबळजनक मागणी केली आहे.

नंदकिशोर गुर्जर यांनी एका मुलाखातीमद्धे संगितले की, देशापुढे कोणीही मोठे असू शकत नाही. आजवर देशासाठी विराट कोहली खेळत आला आहे. देशाचे नाव त्याने मोठे केले आहे.

तो देशभक्त असल्यामुळे अनुष्काला त्याने तात्काळ घटस्फोट द्यायला हवा. विराटसोबत अनुष्का राहत आहे आणि राष्ट्रदोहाचे काम तिने केल्याचे म्हणत गुर्जर यांनी विराटला सल्ला दिला आहे.

नंदकिशोर गुर्जर यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रक जारी केले होते. या पत्रकामध्ये अनुष्का शर्माने तिच्या वेब सीरिजमध्ये एका गुन्हेगारासोबत नंदकिशोर गुर्जर यांचा फोटो दाखवला होता.

तसेच तिने तो दाखवण्याआधी त्यांची संमती घेतली नव्हती. तिने या कृत्यातून गुर्जर समुदायाचा अपमान केला आहे.

त्याचबरोबर या वेब सीरिजमध्ये गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण दाखवण्यात आल्यामुळे पाताल लोक या वेब सीरिजवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment