अहमदनगर ब्रेकिंग : भावासमोर बहिणीची आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील ओढ्याच्या कडेला असलेल्या आंब्याला दोरीने गळफास घेऊन 13 वर्षीय मुलीने आत्महत्या केली.

विशेष म्हणजे आपल्या 9 वर्षांच्या भावासमोरच तिने हे कृत्य केले. ती आत्महत्या करीत असताना भावाने वाचण्याचा प्रयत्न केला होता. का अन्य तिसरेच कारण आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत.

पूजा झारदास भोसले हे मयत मुलीचे नाव आहे. निघोज येथील पूजाने काल सायंकाळी भावासमक्ष आंब्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उत्तरीय तपसणीसाठी तिचा मृतदेह पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी भेट दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment