अहमदनगर ब्रेकिंग : धोका वाढला,कोरोनाचे आणखी 9 रुग्ण आढळले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  आज जिल्ह्यात ०९ नवीन रुग्ण वाढले आहेत,६० अहवालापैकी ५१ निगेटिव्ह तर ०९ पॉझिटिव्ह आले आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी नऊ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 112 झाली आहे.

व उपचारार्थींची संख्या 45 झाली आहे. ही रुग्ण अकोले, संगमनेर, पारनेर, शेवगाव आणि राहाता आदी भागातील आहेत.

घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले ०१, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला १, संगमनेर २, निमगाव (राहाता) ४.

बाधीत रुग्णामध्ये ०४ पुरुष,०४ महिला आणि ०४ वर्षीय लहान मुलगी यांचा समावेश आहे.

*निमगाव येथील व्यक्ती यापूर्वीच्या बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील. बाधीत रुग्णात वडील आणि मुलगी यांचा समावेश.
*संगमनेर येथील ४० वर्षीय महिला रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवत असल्याने ग्रामीण रुग्णालय संगमनेरने पाठवले होते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये.

दुसरा ५५ वर्षीय पुरुषाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयाने पाठवले होते जिल्हा रुग्णालययात. तेथे याचा अहवाल पॉझिटिव्ह.

घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कातील.
चाकण येथून ढोर जळगाव येथे आलेला ३० वर्षीय युवक बाधीत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment