अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- संगमनेर शहरात मदिनानगर परिसरात 55 वर्षींय रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

धक्कादायक म्हणजे हा व्यक्ती फालुदा विकत असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे त्यांनी काही परिसर सील केला आहे.

आज सकाळी संगमनेरचे दोन रुग्ण कोरोनाबाधीत मिळून आले होते. त्यातील हा पुरुष असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

संगमनेर शहरात मदिना नगर येथे दोन स्थानिक रुग्ण कोरोना बाधित मिळून आले होतेे.

त्यामुळे, त्यांच्या संर्कात कोण-कोण आले आहे. तसेच हे बाधित रूग्ण कोणाच्या संपर्कात आहे याचा शोध सुरू केला होता.

त्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आले की, जो 55 वर्षींय पुरूष होता. तो फालुदा विक्री करणारा होता. त्यामुळे त्याला कोणाच्या माध्यमातून लागण झाली.

आज शुक्रवार 29 रोजी दुपारी तो मयत झाला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात कोण आले होते याचा शोध सुरू आहे.

तर ज्या दुसर्‍या 40 वर्षींय महिलाला कोरोनाची लगण झाली आहे.

त्यांचे पतीदेव यांचा खारीक विक्रीचा व्यवसाय आहे. ते मालेगाव येथून हा व्यवाहार करीत असल्याची प्राथमीक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

त्यामुळे मयत व्यक्तीच्या संपर्क व महिलेच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तींचा प्रशासन कसून शोध घेत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment