अहमदनगर ब्रेकिंग : जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काल जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला आहे.

आज शुक्रवारी सकाळी ८-४५ वाजता मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

या महिलेचे काल सिझरियन करण्यात आले होते. या महिलेने काल एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता.

दोन्ही बाळांची तब्बेत ठीक आहे. या महिलेला सीझरियन प्रसूती झाल्यानंतर आयसियू मध्ये ठेवण्यात आले होते.

कोरोना बाधीत असलेल्या या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती, असे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी सांगितले.

ही महिला मुंबईहून निंबलक येथे आली होती. त्यानंतर तपासणीत ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment