Maharashtra

कोरोना इफेक्ट: मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी लागू शकतील ‘इतके’ महिने

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-मुंबई: संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असून भारतातही याचे संक्रमण वाढतच चालले आहे. महाराष्ट्रासह आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे.

लॉकडाऊनमुळे राज्यासह मुंबईतल्या आर्थिक व्यवहाराची घडी विस्कटली आहे. दरम्यान आता आलेल्या अहवालानुसार, लॉकडाऊननंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान 9 ते 12 महिने लागणार आहेत.

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीनं (क्रेडाई-एमसीएचआय) आपल्या नव्या अहवालात हे नमूद केले आहे. त्यामुळे एक लक्षात येतं की, मुंबईतील आर्थिक घडी नीट होण्यासाठी आणखीन एक वर्षांचा कालावधी लागू शकतो.

क्रेडाई-एमसीआयने प्रश्नावलीच्या माध्यमातून 500 सदस्यांच्या माहितीच्या आधारानं हा अहवाल प्रकाशित केला आहे. 60 टक्के विकासक मानतात की, लॉकडाऊननंतर 9 -12 महिन्यांत रिअल इस्टेटचा व्यवसाय सामान्य होताना दिसेल तर केवळ 30 टक्के विकासकांच्या मते 6 महिन्यांत व्यवसाय सामान्य होईल,

असं या अहवालाच्या संशोधनातून समोर आलं आहे. हा अहवाल तयार करताना क्रेडाई-एमसीआयआयने त्यांच्या सदस्यांनी यात सहभाग घेतला.क्रेडाई-एमसीएचआय या संशोधन अहवालात अनेक आर्थिक,

सरकारशी संबंधित, कामगारांशी संबंधित, प्रकल्प पूर्ण करणे आणि ग्राहकांशी संबंधित रणनीती नमूद करण्यात आल्यात. काही विकासक एक धोरणात्मक पवित्रा घेऊन एकमेकांच्या सहकार्याने आणि भागिदारी करत प्रकल्प करत आहेत.

तसंच ते विकासक बार्टर एग्रिमेंट करू शकतील असे सप्लायर्स आणि व्हेंडर्सना प्राधान्य देत आहेत. बांधकाम क्षेत्राबाबत केलेल्या सर्वेक्षणानुसार सध्या उद्भवलेल्या कठीण परिस्थितीतही 83 टक्के विकासकांनी आपल्या उद्योगाशी दृढता आणि आत्मविश्वास दाखवून याच व्यवसायात कायम राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं नयन शाह म्हणालेत.

दरम्यान योग्य किंमत मिळाली तर जवळपास 50 टक्के विकसक नवी मालमत्ता खरेदी करण्यासाठीही इच्छुक आहेत. तसेच 2021 सालापर्यंत निवासी क्षेत्रात प्रकल्प सुरू करण्याची तयारीही दाखवली आहे.

भविष्यातील प्रकल्पांमध्ये WHF (White House Fellow ship)विचारात घेऊन डिझाइनमध्ये काही बदल घडवणं यानंतर बंधनकारक असेल, पण काही विकासक सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांतून प्रयत्न करण्यासाठी उत्सुक असल्याचंही शाह यांनी सांगितलं.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button