व्हिएतनाममध्ये सापडले अकराशे वर्षांपूर्वीचे शिवलिंग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-दक्षिण आशियाई देश व्हिएतनाम येथे ‘माई सोन मंदिर’ परिसरात उत्खननादरम्यान अकराशे वर्षांपूर्वीचे शिवलिंग सापडले आहे.

हे शिवलिंग बलुआ दगडात कोरलेले असून या संबंधी हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी ट्विटरवर माहिती दिली असून फोटो शेअर केले

आहेत.दक्षिण आशियाई देश व्हिएतनाम आणि हिंदुस्थानचे संबंध शेकडो वर्ष जुने आहेत. याचे पुरावे वेळोवेळी मिळाले आहेत.

पुरातत्व विभागाला खोदकामादरम्यान नवव्या शतकातील शिवलिंग सापडले आहे. बलुआ दगडात कोरण्यात आलेले हे शिवलिंग 1100 वर्ष जुने आहे.

विशेष म्हणजे आजही एवढ्या वर्षांनंतर शिवलिंगाची थोडी देखील झीज झालेली नाही. व्हिएतनामच्या ‘माई सोन मंदिर’ परिसरात सुरू असलेल्या उत्खननात हे शिवलिंग सापडल्याची माहिती पुरातत्व विभागाने दिली.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या शोधाबाबत पुरातत्व विभागाचे अभिनंदन केले आहे. जयशंकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर नवव्या शतकातील या शिवलिंगाचे फोटो ट्विट केले आहे.

व्हिएतनाममधील माई सोन मंदिरावर हिंदू धर्माचा प्रभाव दिसून येतो. येथे श्रीकृष्ण, विष्णू, शंकर यांच्या अनेक मूर्ती आहेत.

हे मंदिर चंपाच्या राजाने चौथ्या ते 14 व्या शतकादरम्यान केले होते. व्हिएतनामचा हा भाग तेव्हा हिंदू राज्याचा भाग होता.

चम समुदायाच्या लोकांचा प्रभाव येथे दुसऱ्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत होता.

चम समुदायाचे लोक हिंदू होते,मात्र पुढे त्यांनी बौद्ध आणि इस्लाम धर्म स्वीकारला. व्हिएतनाम-अमेरिका युद्धादरम्यान या मंदिराचे प्रचंड नुकसान झाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment