भर रस्त्यात पतीनं कोयत्याने केली पत्नीची हत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :पतीने पत्नीची भर रस्त्यावर कोयत्याने निर्घृण हत्या केल्याचे खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

उर्मीला रमेश मस्के (वय 37 ) असे मयत महिलेचं नाव असून आरोपी रमेश मस्के याने स्वतः पोलिसांत जाऊन घटनेची कबुली दिली. या प्रकरणी पती रमेश मस्के विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

कोरोनाचा कहर एका बाजूला आणि बीड जिल्हयात महिन्याभरात आठ खून, पाच पेक्षा अधिक आत्महत्या आणि मारहानीच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे.

आताही हत्येचा असाच खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भर रस्त्यावर पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने कोयता मृतदेहावर ठेवला आणि गाडीवर बसून आरामात शहर पोलीस ठाण्यात जावून पोलीसांना घटनेची माहिती दिली.

या सगळ्या घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर पोलीस आता प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment