Lifestyle

सॅनिटायझर वापरताय? अतिरिक्त वापराने होऊ शकतात ‘हे’ आजार

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : सध्या कोरोनाने सर्वत्र कहर घातला आहे. यावर लस नसल्याने वैयक्तिक काळजी घेणे एवढेच आपल्या हाती आहे. यासाठी स्वच्छताराखण्यासाठी व निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर वापरले जाते.

परंतु या अतिरेकामुळे कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार हातावर सॅनिटायझरचा वापरही घातक ठरत असल्याचे दिसून येत आहे. सॅनिटायझरच्या वापरामुळे तो जीवाणू मरत नाही, तर त्या जीवाणूची वाढ रोखली जाते.

तसेच, वारंवार सॅनिटायझरचा वापर केल्याने त्वचाविकार उद्धभवू शकतो. खाज येणे, आग होणे, हात लाल पडणे असे आजार होऊ शकतात. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे गजकर्ण, त्वचा कॅन्सर तसेच पेशींवरही परिणाम होतो.

त्यामुळे सॅनिटायझरऐवजी शक्यतो साबणाचा वापर करावा. ज्यावेळी साबण आणि पाणी उपलब्ध होऊ शकत नसेल त्यावेळी त्याचा वापर करावा. तसेच, 60 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कहोलचे प्रमाण असलेल्या सॅनिटायझरचा वापर करावा,

अशी माहिती डॉ. सुचिता लवंगरे देतात. सध्या अनेक महिला बाजारातून भाज्या आणल्यानंतर पाण्यामध्ये सॅनिटायझर टाकून भाज्या धुतात. परंतु, हे जीवाणू मारण्यासाठी प्रभावी ठरत नाही, तर आरोग्यास हानिकारक ठरते.

त्यामुळे भाज्या आणल्यानंतर त्या नळाच्या पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्याव्यात. तसेच, यानंतर भाज्या धुण्यासाठी बेकिंग सोडय़ाचाही वापर करू शकतो. यामुळे शेतात भाज्यांवर मारलेले रासायनिक खत निघून जाते.

आपण कायम स्वरूपी याचा वापर करू शकतो. यामुळे कोणतीही हानी होत नाही. विशेषतः तुरटी अधिक प्रभावी ठरते. तुरटीच्या पाण्यात मिनीटभर भाज्या धुतल्याने त्यावरील सर्व जीवाणूंचा नायनाट होतो. तसेच, तुरटीही आरोग्यास हानिकारक नसल्याचे डॉ. लवंगरे सांगतात.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button