Ahmednagar NewsMaharashtraSpacial

चांदबिबी बोलणार? किल्ला स्वत:चा इतिहास जगाला सांगणार का?

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- 530 वर्षाचा इतिहास आणि  त्याकाळी कैरो – बगदाद शहरांसोबत नगरचे नाव घेतले जात होते. मात्र आम्ही नगरी नगरकर म्हणून फक्त  वर्धापन दिनात रमलो. इतिहासाचा फक्त बाजार मांडला; पण  नगर मात्र चांदबिबीने सोडले तेथेच राहिले. चांदबिबी आणी किल्ला मात्र जगापर्यंत पोहचलेच नाहीत. 

आता तरी आम्ही हे चित्र बदलण्यासाठी  नवनीत विचार मंच – नगर पर्यटनच्या माध्यमातून, पर्यटन परिषदेच्या माध्यमातून नियोजनबद्ध पुढाकार घेइल, अशी माहिती नगर महोत्सवचे मुख्य संयोजक सुधीर मेहता यांनी दिली. ही नगर पर्यटन परिषद शिर्डी आणि नगर येथे होईल, असे नगरच्या स्थापना दिनानिमित्त बोलताना सुधीर मेहता यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी आपण चांदबिबी महालावर अनेक  कार्यक्रम केले. श्रीकांत मोघे,  प्रभाकर पणशीकर,  चित्तरंजन कोल्हटकर,  जगदीश खेबुडकर, रमेश भाटकर,  पद्मश्री क्रांती शाह, पद्मश्री बी. एन. दोशी,  सावरकर फेम शैलेंद्र गौड   असे मान्यवर नगरला आले असताना त्यांनी नगरच्या ऐतिहासिक वैभव आणी समृद्धीची मुक्त कंठाने स्तुती केली.

पद्मश्री दोशी जगप्रसिद्ध आर्किटेक्ट.  त्यांनी चांदबिबीचा महाल पाहिला  येथील इतिहास आणि त्यापेक्षाही या वास्तुचे आर्किटेक्चर येथील स्ट्रक्चर हे जगावेगळे आहे  हे जगासमोर व्यवस्थीत  गेले तर नगरसाठी ती मोठी पर्यटन व्यवसायाची संधी होईल.

विठ्ठल कामत यांनी नगरकराना अंतर्मुख करताना ‘महाल बोलणार आहे का, किल्ला स्वतःचे महत्व इतिहास सांगणार आहे का ?’ असा सवाल केला  होता. पद्मश्री अनिलकुमार लखीना यांनी तर  नगरच्या नेत्याना, कार्यकर्त्याना झापताना तुम्हाला झोप कशी येते असा सवाल जाहिरपणे केला होता.

अनेक उदाहरणे सांगता येतील  पण भुईकोट किल्ला सांगणार का  मी आग्रा आणि रेड फोर्ट इतकाच अनोखा  वेगळा आहे,  फराहबक्ष महल पाहताना  ताजमहालची   संकल्पना  यातुनच सुचली असे नाही म्हंटले तरी ताजमहाल डोळ्यासमोर उभा रहातो.

अगदी काल परवा उभे राहिलेले  रणगाडा संग्रहालय देशातील नव्हे तर आशियातील  एकमेव आहे. आणि अशा निजामशाही मोगाकालीन आणि छत्रपती शिवाजीराजे, शहाजीराजे यांचा रोमहर्षक  स्फुर्तिदायी वारसा;  आणी हे सर्व नगरपासून दहा पंधरा मिनिटावर असताना नगरहून शिनी शिंगणापूरला 50 हजार पर्यटक जातात.

औरंगाबादला अजिंठा वेरूळला जाणारे लाखो पर्यटक येथूनच जातात, मात्र हे पर्यटक नगरच्या ऐतिहासिक समृद्धीबद्दल अनभिज्ञच असतात आणि त्यासाठीच नगर पर्यटनच्या माध्यमातून पर्यटन परिषदेचे आयोजन आणि  विविध उपक्रम पर्यटन विभागाच्या सहकार्याने घेणार असल्याचे सुधीर मेहता यांनी सांगितले.

यंदाचा नगर महोत्सव हा पर्यटन महोत्सव म्हणुनच होइल. नुकतीच ‘हमारी धरोहर  चला नगर पर्यटनाला’  ही  शिक्षक पालक आणि  विद्यार्थ्यांसाठी  झालेल्या स्पर्धेतील पत्र आणि नगरची समृद्धी आढावा घेणार्‍या नगर गौरव ग्रंथ   असे उपक्रम हाती घेत असल्याचे मेहता यांनी सांगितले.

पत्र स्पर्धेतील पर्यटकाना नगरला आवाहन करणारी पत्रे, लेख राज्यातील शाळा महाविद्यालये, ट्रॅव्हल एजंट कंपन्याना पाठवून, त्यांच्या बैठका घेउन राज्यातून पर्यटक विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करण्यात येतील. केवळ मी नगरी म्हणून  नगरचे पर्यटन कसे वाढणार असा प्रश्‍नही मेहता यांनी केला.

चांदबिबी महालावर स्वच्छतागृह तर नाहीच पण प्यायला पाणीही मिळत नाही. तीच बाब सर्वच ऐतिहासिक स्थळांची आहे. आता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महसुल मंत्री बाळासाहेब  थोरात,  जलसंपदा मंत्री शंकरराव  गडाख, ना.प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगरच्या पर्यटन वृद्धी आणि तेथील सुविधा यासाठी साकडे घालणार असल्याचे  मेहता यांनी  सांगितले.  ना दिलिपराव वळसे पाटील यांनी पालकमंत्री असताना घेतला होता तसाच पुढाकार ना. मुश्रीफ,  ना. थोरात, ना.गडाख  घेतील असा विश्‍वास सुधीर मेहता यांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button