Ahmednagar NewsAhmednagar SouthCrime

पती पत्नीला कुर्‍हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- जामखेड तालुक्यातील डोळेवाडी येथे घराची भिंत माझ्या हद्दीत आली असून संध्याकाळपर्यंत ती काढून न घेतल्याने 13 जणांनी रामदास खाडे व त्यांची पत्नीला तलवार, लोखंडी पाईप, गज, दगड व कुर्‍हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पती-पत्नी यांनी घाबरून घरात जाऊन दरवाजा लावला व पोलिसांना संपर्क केला योगायोगाने पोलीस उपअधीक्षक संजय सातव जामखेड पोलिस स्टेशनला उपस्थित असल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व तेथील जमावाला पांगविले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व महिलेच्या फिर्यादीवरून 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे.

जामखेड पोलिसात कुसुम रामदास खाडे (रा. डोळेवाडी) यांनी फिर्याद देऊन शिवदास बाबासाहेब खाडे व त्यांचे मुले मोहन बाबासाहेब खाडे, सुभाष बाबासाहेब खाडे, विष्णू बाबासाहेब खाडे (रा. डोळेवाडी)

यांच्या बरोबर शेतीचे बांध, सामायीक विहीर व पाईपलाईन याकारणावरून एक वर्षांपासून वाद चालू आहे. याबाबत वेळोवेळी जामखेड पोलिसात तक्रार अर्ज दिले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button