Maharashtra

अबब! तरुणाच्या नाकात महिनाभर होती चार इंच लांबीची जळू

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-एका तरुणाच्या नाकात तब्बल २५ दिवस जळू अडकून पडली होती. २५ दिवसानंतर डॉक्टरांनी वेगळी शक्कल लढवत तिला बाहेर काढले.

ही घटना आहे कणकवली तालुक्यातील डिगवळे गावातील. या गावातील शुभम परब हा विद्यार्थी दहावीची परीक्षा दिल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी नेहमीच घरालगतच्या जंगलात जायचा.

एक दिवस जंगलातच पाणवठ्यावर ओंजळीने पाणी पित असताना एक जळू नाकात शिरली. २५ दिवसानंतर त्याच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला.

सुरवातीला तो उष्णतेने किंवा इतर कारणाने होत असेल असे घरातील मंडळीना वाटू लागले. मात्र एका रात्री ही जळू नाकातून थोडी बाहेर आली आणि शुभमला आपल्या नाकात काहीतरी असल्याचा भास झाला.

डॉक्टरांना दाखवल्यानंतर शुभमच्या नाकात जळू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जळू नाकातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण उपयोग झाला नाही.

अखेर एक दिवस शुभमच डॉक्टरांना म्हणाला की ही जळू रात्री झोपल्यावर थोडी बाहेर येते. मग डॉक्टरांनी वेगळी युक्ती केली. त्यांच्या दवाखान्यातील सर्व लाईट्स, पंखे बंद करुन अंधार केला गेला.

या अंधाराबरोबरच शांतता राखण्यात आली. तब्बल ४० मिनिटे वाट पाहिल्यांनतर त्या जळूने शेपटीच्या भागाकडून थोडंसं बाहेर येण्याचा प्रयत्न करताच डॉक्टरनी लागलीच चिमटयाच्या साहाय्याने पकडून त्या जळूला बाहेर काढलं.

नाकात तब्बल एक महिन्याचा लॉकडाऊन पूर्ण करुन कोणतीही इजा न करता ही जळू बाहेर आली. बाहेर सरकणारी ती जळू ३ ते ४ इंच लांब होती. पण ओढून काढताना तिची लांबी ७ ते ८ इंच झाली होती, अशी माहिती डॉक्टर पराग मुंडले यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button