कोरोनापाठोपाठ महाराष्ट्रावर येतंय ‘हे’ मोठं संकट;एनडीआरएफ सज्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. या आपत्तीस तोंड देत असताना आता महाराष्ट्रावर मोठं संकट आलं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढच्या २४ तासांत आणखी वाढणार असून त्यातून चक्रीवादळ निर्माण होणार आहे.

या चक्रीवादळाचा जब्बर तडाखा महाराष्ट्राला बसू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ३ जून रोजी हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असून रायगडमधील हरिहरेश्वरपासून ते दमणपर्यत पट्ट्यात त्याचा परिणाम जाणवणार आहे.

या तीन दिवसांत मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊसही पडण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ असा दुहेरी धोका आहे.

हे चक्रीवादळ उत्तरेकडे जाणार आहे. पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचे असतील आणि ३ जूनला संध्याकाळी किंवा रात्री चक्रीवादळ घोंगावू शकते. मुंबईत ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

३ जून रोजी उत्तर कोकणात ठाणे, मुंबई, रायगड आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. ३ जूनच्या संध्याकाळी किंवा रात्री दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान वादळ येण्याची शक्यता आहे.

एनडीआरएफ सज्ज मुसळधार, अतिमुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन मुंबईसह उत्तर कोकण किनारपट्टीवर एनडीआरफच्या ९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

त्यापैकी ३ तुकड्या मुंबईत, दोन पालघरमध्ये, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एक तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment