भिंगारचे प्रश्‍न सोडविण्यासह बाजारतळ येथील दुकान उघडण्यास आमदार जगतापांचा पुढाकार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये भिंगार छावणी परिषद येथील बाजारतळ मधील दुकाने दोन ते तीन महिन्यापासून बंद आहेत.

सदरील बाजारतळ उघडण्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पवार यांनी शुक्रवार दि.5 जून पासून आठवडे बाजार न भरवता दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे आश्‍वासन दिले.

केंद्र व राज्यसरकारच्या निर्देशानुसार अनेक व्यापारी व उद्योजकांना सवलती मिळून त्यांचे व्यवसाय पुर्ववत सुरु झाले आहेत. मात्र भिंगार छावणी मधील बाजारतळचे दुकाने आजही बंद अवस्थेत आहे.

यामुळे येथील दुकानदार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असता, आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन सदर प्रश्‍नी चर्चा केली.

तसेच आमदार जगताप यांनी भिंगार येथील पथदिवे व बोअरिंगचा प्रश्‍न उपस्थित केला. मुख्यकार्यकारी अधिकारी पवार यांनी शुक्रवार दि.5 जून पासून आठवडे बाजार न भरवता दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. दुकानदार व ग्राहकांना फिजीकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करुन मास्क आणि सॅनीटायझरचा वापर वापर करण्याचे स्पष्ट केले.

तर येत्या दोन दिवसात भिंगार हद्दीतील बंद असलेले पथदिवे व बोअरिंग दुरुस्ती केली जाणार असल्याचे सांगितले आहे. या बैठकीप्रसंगी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद, कलीम शेख, संजय सपकाळ, सुरेश मेहतानी, संजय खताडे, मतीन ठाकरे, पियुष भंडारी, सागर भुजबळ, मुसद्दिक सय्यद, दीपक लिपाने, आसिफ शेख, नूर शेख, संजय बाबर, नितीन लिपारे,

दत्तात्रय खेतमाळस, सुनील पानसरे, सुमन कुठे, नीलेश भोसले, सुनील साळुंखे, सीताराम पोतकुळे आदींसह व्यापारी व दुकानदार उपस्थित होते. मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी………………. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर भिंगार छावणी परिषद हद्दीतील बाजारतळ येथील दुकाने दोन ते तीन महिन्यापासून बंद असून,

ते त्वरीत उघडण्यास परवानगी मिळण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद, कलीम शेख, संजय सपकाळ, सुरेश मेहतानी, संजय खताडे, मतीन ठाकरे, पियुष भंडारी, सागर भुजबळ, मुसद्दिक सय्यद, दीपक लिपाने, आसिफ शेख, नूर शेख, संजय बाबर, नितीन लिपारे आदि.

Leave a Comment