BusinessEntertainment

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचे मानधन ऐकून येईल चक्कर

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सलमान खानचे बॉलिवूड वर नेहमीच वर्चस्व गाजवले. त्याचा चित्रपट म्हटलं की १०० कोटींचा बिझनेस नक्की मानला जातो. सलमान लोकांच्या मदतीसाठी प्रसिद्ध आहे.

कोरोना व्हायरसच्या काळात तो विविध माध्यमाद्वारे लोकांना मदत करत आहे. सलमानच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आपल्या बॉडीगार्डशिवाय जात नाही.

आणि त्याच्या खास बॉडीगार्ड शेराच मानधन आहे वार्षिक २ कोटी रुपये म्हणजेच महिन्याला १६ लाख रुपये आहे. त्याच्या सिक्युरीटीसाठी अनेक बॉडीगार्ड असतात.

पण या सगळ्यात गेल्या अनेक वर्षांपासून एक बॉडीगार्ड त्याच्यासोबत सतत असतो या बॉडीगार्डचे नाव शेरा आहे. शेराने १९९५ मध्ये सलमानच्या एका परदेशातील दौऱ्यासाठी त्याला त्याच्या कंपनीमार्फत सुरक्षा पुरवली होती.

पण त्यानंतर शेराचे काम आवडल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेरा सलमानसोबतच आहे. शेरा हा सलमानच्या सावलीप्रमाणे सतत त्याच्या सोबत असतो.

गेल्या अनेक वर्षांत शेरा हा सलमानच्या कुटुंबीयातील एक भाग बनला आहे. शेराच्या सुखदुःखाच्या प्रसंगी सलमान देखील घरातील एका सदस्याप्रमाणे सामील होतो.

सलमान कोणत्याही ठिकाणी जाण्याआधी शेरा तिथे पोहोचून तिथली व्यवस्था पाहातो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button