Ahmednagar News

विद्यार्थी वाहतुकदारांना सर्व प्रकारच्या कर व फी मध्ये सूट द्यावी -संजय आव्हाड

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शाळा व महाविद्यालय गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून बंद असल्याने विद्यार्थी वाहतुकदारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे.

विद्यार्थी वाहतुकदारांना आधार देण्यासाठी वाहनांचे सर्व प्रकारचे कर व फी मध्ये सूट देण्याची मागणी शहर वाहतुक सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांना देण्यात आले.

यावेळी शहर वाहतुक सेनेचे शहर प्रमुख संजय (बाबासाहेब) आव्हाड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, अ‍ॅड.विनायक सांगळे, अशोक गायकवाड आदी वाहतुक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी राज्य सरकारने मागील तीन महिन्यापुर्वीच शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांची वाहतुक करणार्‍या वाहतुकदारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळून त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या तीन महिन्यापासून वाहतुकदारांचे वाहन घरासमोरच लागले असून, त्यांना शाळा व्यवस्थापन व पालक वर्ग यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे मानधन मिळालेले नाही. विद्यार्थी वाहतुकदारांवर आपल्या मुलांसह कुटुंबीयांची जबाबदारी आहे.

तीन महिन्यापासून उत्पन्नाचे साधन बंद असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. किमान वेतन या कायद्याच्या तरतुदीच्या आधारावर विद्यार्थी वाहतूकदार चालक-मालक महिला मदतनीस वाहक यांना सानुग्रह अनुदान 10 हजार मिळावे, ज्या वाहनाची कागदपत्रे सन 2019-2020 पर्यंत पुर्ण असतील अशा वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र कर, विमा, व्यवसाय कर, पर्यावरण कर व पासिंग फी यामध्ये सूट मिळावी,

लॉकडाऊनमुळे ज्या स्कूल बसची वार्षिक तपासणी होऊ शकली नाही अश्या आठ वर्षावरील वाहनांना पुढील तपासणी पासून दोन वर्षाचे योग्यता फिटनेस प्रमाणपत्र मिळावे, सध्याची परिस्थिती पाहता स्कूल बस वाहनांची पंधरा वर्षाची आयुमर्यादा वीस वर्षे पर्यंत करावी, जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांचे बँकेचे हप्ते बिनव्याजी करून पुढे ढकलण्याची तरतूद करावी,

सभासदांच्या हितासाठी अन्य स्वरूपाची योग्य ती आर्थिक मदत मिळण्याची मागणी नगर शहर वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शाळा व महाविद्यालय गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून बंद असल्याने विद्यार्थी वाहतुकदारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली असताना वाहतुकदारांना आधार देण्यासाठी वाहनांचे सर्व प्रकारचे कर व फी मध्ये सूट देण्यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसिलदार यांना देण्यात आले.

यावेळी शहर वाहतुक सेनेचे शहर प्रमुख संजय (बाबासाहेब) आव्हाड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, अ‍ॅड.विनायक सांगळे, अशोक गायकवाड आदी.

(छाया-वाजिद शेख-नगर) कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शाळा व महाविद्यालय गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून बंद असल्याने विद्यार्थी वाहतुकदारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली असताना वाहतुकदारांना आधार देण्यासाठी वाहनांचे सर्व प्रकारचे कर व फी मध्ये सूट देण्यासह विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले.

यावेळी शहर वाहतुक सेनेचे शहर प्रमुख संजय (बाबासाहेब) आव्हाड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, अ‍ॅड.विनायक सांगळे, अशोक गायकवाड आदी

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close