विलगीकरण कक्षात असलेली ‘ती’ महिला कोरोना पॉझिटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- मुंबई येथून आलेली आणि शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील विलगीकरण कक्षात असलेली ६० वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. 

त्यामुळे तिचा मुलगा-सून व दोन नातवंडे अशा चार जणांना रात्री उशीरा तपासणीसाठी नगरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 ३० मे रोजी सदर कुटुंब मुंबईहुन शहरटाकळी येथे आल्यानंतर त्यांना अंत्रे येथील शहरटाकळी हायस्कूलमधील विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्याच दिवशी महिलेच्या पतीला छातीत त्रास जाणवू लागण्यानंतर दोघांना नगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

रविवारी रात्री उशिरा त्यांचे अहवाल आल्यानंतर महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

 सदर महिला व त्यांच्या कुटुंबाचे मूळ गाव शेवगाव तालुक्यातील मळेगाव आहे. मात्र मुंबई येथून येताना त्यांनी शहरटाकळी येथील पास घेतला आहे.

त्या पासवर वरिष्ठ पोलीस अधिका-याचा शिक्का व सही असल्याची माहिती शहरटाकळीचे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल आव्हाड व तलाठी संदीप आठरे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment