व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर ; एकाच वेळी करता येणार 50 जणांना विडिओ कॉल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : लॉक डाउनच्या काळात सोशल मीडियावर होणाऱ्या वाढत्या मिटींग्स पाहता विविध अँप ने व्हिडीओ कॉलिंगच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. गुगल मीट, झूम मीट आदींद्वारे व्हिडीओ कॉल केले जाऊ लागले .

आता काही दिवसांपूर्वी फेसबुकने सुरु केलेल्या मेसेंजर रुम्स फीचरची सुरुवात व्हॉट्सअ‍ॅप साठी देखील सुरू केले आहे. यातून युजर एकाचवेळी 50 लोकांबरोबर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून जोडले जातात.

या फीचरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप युजर्स स्वत:हून कॉलची सुरुवात करू शकतात किंवा कोणत्याही रूममध्ये जोडले देखील जाऊ शकतात.

असा करा 50 जणांना व्हिडीओ कॉल

-या प्रकारे व्हिडीओ कॉल करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन वर्जन असणे आवश्यक आहे

-त्याचप्रमाणे इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील चांगली असणे गरजेचे आहे

 -फेसबुक मेसेंजरचे देखील लेटेस्ट वर्जन असणे गरजेचे आहे

-या मेसेंजर अ‍ॅपमध्ये तुमच्या फेसबुकने लॉग इन कराव्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करण्यासाठी रुम्स तयार करावी लागले.

 -सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि त्यामध्ये वरती असणाऱ्या कॉल टॅबवर क्लिक करा

 -त्यामध्ये क्रिएट रुम पर्यायावर क्लिक करा

 -त्यानंतर मेसेंजर पर्यायावर Continue वर क्लिक करा

  -यानंतर तुम्हाला मोबाइलमधील ब्राउजरच्या माध्यमातून मेसेंजर अ‍ॅप किंवा मेसेंजर वेबसाइटवर रिडायरेक्ट केले जाईल. कारण हे ‘रुम फीचर’ व्हॉट्सअ‍ॅप बाहेर मेसेंजरमध्ये काम करते

 -त्यानंतर तुम्हाला ट्राय इट यावर टॅप करावे लागेल

-त्यानंतर क्रिएट रुम पर्यायावर क्लिक करा आणि रुमचे नाव बदलू शकता.

-ही तयार केलेली रुम तुम्ही कस्टमाइझ देखील करू शकता. याकरता रुम अ‍ॅक्टिव्हिटीवर क्लिक करा.

-सेंड लिंक ऑन व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा उघडेल. याठिकाणी तुम्हाला सर्च करून तुमच्या फोनमधील काँटॅक्ट जोडता येतील. किंवा तुम्हाला ज्या लोकांबरोबर रुम क्रिएट करायची आहेत, त्यांना देखील ही लिंक पाठवू शकता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment