पावसाळ्यात कोरोना पसरणार की मरणार ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. यावर अजूनही लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे याचे संक्रमण वाढत चालले आहे. आता पावसाने हजेरी लावल्याने पावसाळ्याचे आगमन झाले आहे.

हा पाऊस कोरोना व्हायरसला सोबत घेऊन जाईल की कोरोना विषाणूला आणखी वाढवेल याबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

डेलावेअर विद्यापीठाच्या संसर्गजन्य रोग विभागातील शास्त्रज्ञ जेनिफर होर्ने यांनी म्हटले आहे की, पावसाचे पाणी व्हायरस नष्ट करु शकत नाही. यामुळे व्हायरसचा प्रसार कमी होईल असं म्हणता येणार नाही.

नुसते हात पाण्याने धुतले तर विषाणू मरणार नाही, साबण लावावाच लागेल. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील अप्लाइड फिजिक्सचे शास्त्रज्ञ जेर्ड इवांस म्हणतात की, ‘पावसात कोरोना विषाणूचा काय परिणाम होईल हे अद्याप कळलेले नाही.

तथापि, बहुतेक शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, पावसाच्या ओलाव्यामुळे व्हायरस आणखी पसरु शकतो.’ वॉशिंग्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य, औषध आणि साथीच्या रोगांचे प्राध्यापक जेई बेटेन म्हणतात की, पावसाच्या पाण्यात कोरोनाचा व्हायरस वाहून जावू शकतो.

जसं धुळीचे कण पावसात वाहून जातात. बर्‍याच तज्ञांचे मत आहे की, साबणासारखे निर्जंतुकीकरण करण्यास पाऊस सक्षम नाही.

आपण आपले हात पाण्याने धुऊन घेतल्यास व्हायरस मरणार नाही, त्यासाठी आपल्याल हात साबणाने धुवावे लागतील. पावसाळ्याच्या तोंडावर जगभरातील तज्ञ आणखी खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत. कारण आर्द्रतेमुळे कोरोनाव्हायरस बरेच दिवस हवेत तरंगू शकतो. यामुळे वेगाने संक्रमणाचा धोका वाढू शकतो.असे त्यांचे मत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment