Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भवती ठेवल्याप्रकरणी ‘त्या’ तरुणावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे संबंध ठेवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला पाच महिन्यांची गर्भवती ठेवल्याची घटना अकोले तालुक्‍यात घडली आहे.

याप्रकरणी निळवंडे येथील मच्छिद्र संजय मेंगाळ याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अकोले पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,

दि. १ मे २०१९ ते दि. २० मार्च २०२० पूर्वी शेरणखेल (ता. अकोले ) येथे शेतात आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ (रा.निळवंडे ) याने पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे म्हणून तिच्याबरोबर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

यानंतर पिडितेला मासिक पाळी बंद झाल्याने व पोट दुखू लागल्याने तिने सदर बाब आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी दि. २० मार्च २०२० रोजी सोनोग्राफी केली असता

ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा अहवाल आला आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close