Corona Virus Marathi NewsWorld

कोरोनाच्या लसीसाठी ३० माकडांवर केला जाणार प्रयोग

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :कोरोना विषाणूमुळे देश हैराण झाला आहे. त्यामुळे यावर तात्काळ लस शोधणे गरजेचे आहे. यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले

असून यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. यासाठी ३० माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.

सध्या राज्यात कोरोना विषाणुमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ३० मे २०२० रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. या माकडांवर सर्वप्रथम प्रयोग केला जाणार आहे.

त्यानुसार ही माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे,

पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर उपयोग न करणे आदी अटी शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button