परराज्यातून आलेल्यांना करणार नाही क्वारंटाईन; ‘या’ राज्याचा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : सध्या अनेक राज्यांमधून स्थलांतरण करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परंतु कोरोनाचा प्रदुसरभाव रोखण्यासाठी त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात असे.

परंतु बिहार राज्याने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवारपर्यंत राज्यातील (बिहार) 5 हजार क्वारंटाईन केंद्रामध्ये सुमारे 13 लाख लोकांची नोंदणी झाली आहे.

बिहारमध्ये परत येणारे प्रवासी कामगार, विद्यार्थी किंवा इतर लोकांना यापुढे क्वारंटाईन केले जाणार नाही. यासह राज्यातील सर्व ब्लॉक स्तरीय क्वारंटाईन सेंटर 15 जूनपासून बंद करण्यात येणार आहेत.

बिहार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रधान सचिव सुप्रिया अमृत यांनी सांगितले की, आम्ही 30 लाखाहून अधिक स्थलांतरितांना परत आणले असून सोमवारी संध्याकाळपासून नोंदणी थांबवित आहोत.

त्या म्हणाल्या की, डोर-टू-डोर हेल्थ मॉनिटरींग सुरूच राहिल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून लेव्हल 1 आणि 2 हॉस्पिटलपर्यंत वैद्यकीय सुविधा समान राहील.

3 मे नंतर बिहारला परतलेल्यांपैकी जवळपास २ हजार ७४३ लोकांना कोरोना झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले बहुतेक प्रवासी महाराष्ट्रातून परत आले आहेत. येथून आलेल्या 677 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

याशिवाय दिल्लीतील 628, गुजरातमधील 405 आणि हरियाणामधील 237 लोकांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा तसेच इतर राज्यामधून परत आलेल्या परप्रांतीयांमध्येही कोरोनाची लागण झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment