‘मुंबई-पुणे रिटर्न’मुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : गेल्या पाच दिवसांत ‘मुंबई-पुणे रिटर्न’मुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. अगोदर दोन रुग्ण सापडले असताना पुन्हा एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

अद्याप काही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. विनाकारण रस्त्यावर उभे राहून गप्पा मारणे, दुकानांपुढे सोशल डिस्टन्स न ठेवणे, मास्क न वापरणे अशी वर्तणूक समाजासाठी घातक ठरणार आहे.

शेवगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गेल्या पाच दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा तीनवर पोहोचला.

तालुक्याच्या पूर्व भागातील राणेगावमधील बाधित तरुणाच्या ‘हायरिस्क’ संपर्कातील ११ जणांना तपासणीकरिता नगरला हलवण्यात आले. दरम्यान,

तालुक्यात आढळलेले तिन्ही रुग्ण मुंबई व पुणे परिसरातून परतलेले असल्याने यापुढे बाहेरगावांहून येणाऱ्यांवर स्थानिक पातळीवर प्रशासनाला अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

शेजारील नेवासे, पाथर्डी, पैठण, गेवराई आणि शिरूर कासार या तालुक्यांमध्ये रुग्ण आढळले असतानाही शेवगाव तालुका कोरोनामुक्त होता. मात्र, सर्व प्रथम ढोरजळगाव-शे येथे चाकणवरून आलेल्या एकास लागण झाल्याचे २९ मे रोजी उघड झाले.

३१ मे रोजी शहरटाकळीत मुंबई परिसरातून आलेल्या एका वृद्धेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या बातमीचा धुरळा खाली बसतो न् बसतो तोच कल्याणमध्ये फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असलेला तीस वर्षीय तरुण रविवारी विनापरवानगी आपल्या मूळगावी राणेगावला परतला.

दुसऱ्या दिवशी त्रास जाणवू लागल्यानंतर एका मित्रासह त्याने जिल्हा रुग्णालय गाठले. १ जूनला रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत आढळलेले दोन्ही रुग्ण तालुक्याच्या पश्चिम भागातील होते.

राणेगावमुळे पूर्व भागातही लागण झाली आहे. दरम्यान, दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी राणेगावसह परिसरातील सुमारे ३०-३५ खेड्यांचा बोधेगावशी कायम जवळचा संपर्क असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment