अहमदनगर ब्रेकिंग : महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  कोपरगाव शहरातील एका विद्यालयातील कोरोनाबाधित लिपीकाच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींपैकी शहरातील एका महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नसूनही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर इतर १२ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर यांनी दिली.

राहाता तालुक्यातील लोणी येथील बाधित व्यक्ती मागील आठवड्यात कोपरगाव येथील महिला डॉक्टर यांच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आली होती.

त्यानंतर काही दिवसांनी लोणी येथील ती व्यक्ती कोरोनाबाधित आढळली. त्याच्या संपर्कात आलेल्या कोपरगाव येथील १३ व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यापैकी एक महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्या. कोरोनाबाधित महिला डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा प्रशासनाच्या वतीने शोध सुरु आहे.

तब्बल दोन महिन्यानंतर कोपरगावात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. दरम्यान कोपरगाव शहरातील काही बाधितक्षेत्र घोषित करण्यात आला असून तो सील केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment