रुग्णांच्या संपर्कामुळे अजुनही बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  शेवगाव शहरासह तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कातील आणि हॉटस्पॉट परिसरातून आलेल्या चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची एकूण रुग्ण संख्या सात वर पोहचली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कामुळे अजुनही बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता नागरिकांनीच स्वयंशिस्त बाळगून काळजी घेणे आवश्यक आहे. शेवगाव तालुक्यातील सर्वप्रथम ढोरजळगाव येथे चाकण (पुणे) येथून आलेला एक जण,

त्यानंतर शहरटाकळीमध्ये मुंबईवरुन आलेल्या एका महिलेला आणि राणेगांव मधील एका तरुणाला लागण झाल्याचे उघड झाले होते.

त्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणीकरिता नगरला पाठवले असता त्यांच्या पैकी दोघांचे तर भांडुप(मुंबई) वरुन आलेल्या परंतु शेवगावला क्वारंटाईन असलेले एक जोडपे असे चौघांचे रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आले.

यात राणेगांवमधील बाधितासोबत मुंबईस जावून आलेल्या एक ३२ वर्षीय युवक,शहरटाकळी येथील बाधित आलेल्या महिलेचा ६० वर्षीय पतीचा (पत्नी पॉझिटिव्ह आल्यावर तपासणीअंती प्रथम अहवाल निगेटिव्ह आला होता.

तसेच भांडूप (मुंबई) वरुन आलेल्या व शेवगावमध्ये संस्थात्मक क्वारंटाइन असलेल्या एका ५५ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment